गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

कठीण परिश्रम

 *कठीण परिश्रम



ज्या विद्यार्थ्याची इच्छाशक्ती अदम्य आहे व जोडीला कठोर परिश्रम घेण्याची तयारी आहे त्या विद्यार्थ्यांची प्रगती निश्चित ठरलेलीच असते. म्हणूनच विद्यार्थीदशेत असताना प्रत्येक विद्यार्थ्याने कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवायलाच हवी. यश हे एका रात्रीत जादूसारखे मिळत नाही. त्यासाठी अहर्निश धडपड करावी लागते. प्रत्येक विद्यार्थी आपल्या मनात जे रुजते त्या ज्ञानक्षेत्राळत प्रावीण्य मिळविण्यासाठी धडपड करू शकतो. मात्र त्यासाठी अर्जुन, एकलव्य यांच्यासारखी तपश्चर्या करावी लागते. अभ्यासाबरोबर आत्मविश्वास व प्रामणिक कष्ट घेण्याची तयारी असेल तर कोणताही विद्यार्थी एखादे असाध्य वाटणारे ध्येय प्रत्यक्षात साध्य करू शकतो. सतत पाण्याची धार पडली की अभेद्य दगडही फुटतात.


अभ्यास करताना परीक्षेत आपणास चांगल्या प्रकारे मार्क्स मिळावे अशी प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते. प्रत्येक जण त्यादृष्टीनेच प्रयत्न करीत असतो. पण कोणाला यश मिळते तर कोणी अयशस्वी ठरतो. अयशस्वी होण्याचे कारण म्हणजे अपुरे प्रयत्न, अपयशाची भीती व प्रामाणिक कृतिशील इच्छा नसते. अभ्यास करताना जर विद्यार्थ्याची प्रामाणिक कृतिशील इच्छा असेल व आपण यश मिळवायचेच अशी तीव्र इच्छा असेल, तर परिस्थिती कितीही बिकट असो त्या विद्यार्थ्यासाठी यश हे ठेवलेलेच असते.


*

यशस्वी होण्यासाठी 

https://digambarshinde.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you very much for your valuable feedback. Visit again