गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

सोमवार, २७ जानेवारी, २०२०

गुरुदेव संगीत विद्यालयाची मैफल उत्साहात संपन्न

गुरुदेव संगीत विद्यालयाची संगीत मैफल उत्साहात संपन्न.


*ड्रीम्स औरंगाबाद महोत्सव 2020*
      *AB EVENTS & MEDIA* तर्फे
गुरुदेव संगीत विद्यालयाच्या वतीने गायन वादन मैफल झाली.
विद्यार्थ्यांच्या गायनाने तसेच तबलावादनाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
गणेश मठपती, रसिका बोर्डे, यज्ञेश निंबाळकर यांनी भावगीते सादर केली.
कृष्णार्थ शिंदे, स्वरांगी शिंदे, तन्मय पालकर यांनी स्वतंत्र तबला वादन सादर केले.
गौरव काकडे, संचित धाडगे, स्वरांगी शिंदे, शाम पवार आणि चैतन्य गिरगावकर यांनी तिनताल मध्ये सहवादन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी दिलावर पठाण सर यांचे बहारदार गायन झाले. त्यांना तबलासाथ संगीत विद्यालयाचे संचालक श्री दिगंबर शिंदे यांनी दिली.
कार्यक्रमाचे निवेदन सौ.चैताली शिंदे       
 हा कार्यक्रम जबिंदा ग्राउंड, शहानूर मियाँ दर्गा, बीड बायपास रोड, औ.बाद येथे दिनांक 25 जानेवारी 2020 रोजी संपन्न झाला.














https://m.facebook.com/story.php?story_fbid=2857458364292953&id=1096881733683967

मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

गुरुकृपा संगीतालय, अंबरनाथ चा विद्यार्थी चमकला

श्री. सुनील शंकर शेलार सर यांच्या विद्यार्थ्याची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड
आज 22 जानेवारी रोजी दिल्लीत शानदार सत्कार समारंभ

कु.अथर्व मनोज लोहार याचे व त्याचे गुरु आणि पालकांचे भारतातील विविध राज्यांतून अभिनंदन केले जात आहे.