गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

गुरुवार, ४ जुलै, २०१९

कलांकुर फाऊंडेशन संचलित गुरूदेव संगीत विद्यालय तर्फे आयोजित शास्त्रीय गायन वादन संगीत सभा


दिनांक ३० जून 2019 
कलांकुर फाऊंडेशन संचलित गुरूदेव संगीत विद्यालय तर्फे आयोजित शास्त्रीय गायन वादन संगीत सभा
कलांकुर फाऊंडेशन संचलित गुरूदेव संगीत विद्यालयातर्फे संगीत सभेचे आयोजन दि.३० जून २०१९ रोजी साईंबन अपार्टमेन्ट, सुंदरवाड़ी, केम्ब्रिज चौक, चिकलठाणा, औ.बाद येथे सपन्न झाली. या संगीत सभेत गुरुदेव संगीत विद्यालयाच्या सुंदरवाडी शाखेतील विद्यार्थ्यांनी स्वतंत्र गायन व तबला  वादन अतिशय सुरेख रितीने सादर केले.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. गुरुदेव संगीत विद्यालयाच्या सुंदरवाडी शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे गायन आणि तबला वादन सुश्राव्य-बहारदार सादर झाले. प्रसंगी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल मुम्बई सत्र अप्रैल२०१९ च्या सत्रातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सभेसाठी  श्री. भगवान निंबाळकर, श्री.गजानन पालकर, श्री.रांजने काका, श्री.कृष्णा काळे, श्री.प्रकाश धस, श्री.वंशीधर सोमवंशी, श्री. विजय हंडोरे, श्री. सोपान पठाडे आदी मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही संगीत सभा कलांकुर फाऊंडेशनचे सचिव तसेच गुरूदेव संगीत विद्यालयचे संचालक श्री. दिगंबर शिंदे, तसेच कलांकुर फाऊंडेशनचे  अध्यक्षा सौ. चैताली शिंदे यांनी आयोजित केली.
ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये संगीत शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी कलांकुर फाऊंडेशन आणि गुरुदेव संगीत विद्यालय विद्यार्थ्यांचा अंतर्भाव करून नेहमी कार्यक्रम सादर करत असते. 
सध्या विद्यालयात चिकलठाणा,झाल्टा, शेंद्रा, हिरापुर, करमाड या ठिकाणाहून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित श्रोत्यांनी दाद दिली. एकंदरीत कार्यक्रम खूप छान झाला,या कार्यक्रमाचे काही क्षणचित्रे............