गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

दत्तात्रेय विष्णू पलुसकर

दत्तात्रेय विष्णू पलुसकर

दत्तात्रेय विष्णू पलुस्कर
D v paluskar.jpg
दत्तात्रेय विष्णू पलुसकर
आयुष्य
जन्म मे १८, इ.स. १९२१
जन्म स्थान नाशिक, महाराष्ट्र
मृत्यू ऑक्टोबर २५, इ.स. १९५५
पारिवारिक माहिती
वडील विष्णू दिगंबर पलुस्कर
संगीत साधना
गुरू विष्णू दिगंबर पलुस्कर
विनायकराव पटवर्धन
नारायणराव व्यास
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
भजन
घराणे ग्वाल्हेर घराणे
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र हिंदुस्तानी गायन

पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर (१८ मे, इ.स. १९२१ - २५ ऑक्टोबर, इ.स. १९५५) 

हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतले प्रसिद्ध गायक होते. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातले पलुस. प्रसिद्ध गायक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर ह्यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या आईचे नाव रमाबाई, आणि पत्‍नीचे उषाताई. विनायकराव पटवर्धन हे पलुस्करांचे गायनगुरू होत.
अभिजात हिंदुस्तानी संगीतामधील ग्वाल्हेर घराण्याचे पंडित दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुस्कर हे गायकांचे मुकुटमणी आहेत. अल्पायुषी ठरलेला हा मधुरकंठी गायक आपल्या अद्भुत गानकलेचा वारसा मागे ठेवून गेला. वयाच्या चौदाव्या वर्षी द,वि, पलुस्कर यांचे गाणे जालंधरला झाले होते. छोट्या अवधीमध्ये एखादा राग उत्कृष्ट प्रकारे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होती. दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले. पण याही छोट्या आयुष्यात पलुस्करांनी पुणे, नाशिक, कुरुंदवाड, कलकत्ता, लखनौ, बनारस, पतियाळा, जालंधर, अमृतसर अशा भारतभरांतील शहरांत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले. त्यांची गायकी देशभर लोकप्रिय होती.

चरित्रग्रंथ

पलुसकर यांचे ’गानयोगी पं.द.वि.पलुस्कर’ या नावाचे चरित्र अंजली कीर्तने यांनी लिहिले आहे. ते ’नवचैतन्य’ने प्रकाशित केले आहे. त्यासाठी पलुस्करांनी लिहिलेल्या १२ वर्षांच्या रोजनिशीचा अभ्यास कीर्तने यांनी केला होता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you very much for your valuable feedback. Visit again