गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

दिल्ली घराणे

दिल्ली घराणे
दिल्ली बाजाला चाटीचा बाज किंवा दोन बोटांचा बाज असे म्हटले जाते. कारण यात चाट आणि शाईचा वापर जास्त होतो. त्यासाठी तर्जनी व मध्यमाचा या दोन बोटांचा अधिकतर वापर केला जातो. ना, ता, तिरकिट ,धागे, धागेन , ताकेन , धिनगीन, तिनकीन , अशा अक्षरसमूहांचा वापर अधिक होतो. पेशकार, कायदे, हे दिल्ली बाजाचं वैशिष्ट्य असून मुलायम वादन व अति जलद गती एक खास भाग आहे. उ. अहमदजान तिरखवा 
असे म्हटले जाते पंजाब घराणे सोडले तर बाकी सर्व घराण्यांचे मूळ गुरू शिष्याच्या नात्याने दिल्ली घराण्याशी जोडले गेले आहे.
त्यामुळे टॅबल्यातील आद्य घराणे म्हणून दिल्ली घराण्याचा उल्लेख केला जातो. उ. सिद्धारखां दाढी हेच या घराण्याचा आद्य वादक आणि प्रवर्तक आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you very much for your valuable feedback. Visit again