गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

राग माहिती

राग :भूप/ भुपाली

-:शास्रीय माहीती :-

o  हा राग कल्याण थाटातून नीर्माण होतो.

o  या रागाचा वादी स्वर गंधार असून संवादी स्वर धैवत आहे.

o  या रागात मध्यम आणि नीषाद वर्ज्य असल्यामुळे या रागाची रागजातीओडव -ओडव अशी आहे.या रागाचा गानसमय रात्रीचा प्रथम आहे.

o  रागविशेष:-या रागात सर्व स्वर शुद्ध आहेत, हा लोकप्रिय राग आहे.

(या रागाचा आरोह अवरोह पुढीलप्रमाणे )

आरोह :-        सा, रे, ग, प, ध, सां

अवरोह :-       सां, ध, प, ग, रे, सा

राग: काफी

शास्रीय माहिती

o   हा राग काफी थाटातून नीर्माण होतो.

o   या रागाचा वादी स्वर पंचम असून संवादी स्वर रिषभ आहे.

o   या रागात सर्व स्वर आहेत .

o   म्हणून या रागाची रागजाती संपूर्ण आहे .

o   हा राग सकाळ सोडून केव्हाही गातात .

रागविशेष :-

या रागात गंधार  आणि नीषाद हे दोन स्वर कोमल आहेत ,या रागात बदेख्याल गायन केले जात नाही.हा लोकप्रिय राग आहे .

(या रागाचा आरोह अवरोह पुढीलप्रमाणे )

आरोह :-सा,रे,ग,म,प,ध,नी,सां

अवरोह :-सां ,नी,ध प,म,ग,रे,सा 

राग:खमाज

थाट:-खमाज                       वादी स्वर :-गंधार

संवादी स्वर :-  नीषाद            रागजाती :-षाडव –संपूर्ण ,

गानसमय:-      रात्रीचा दुसरा प्रहर

रागविशेष :-

o  या रागाच्या आरोहात रिषभ वर्ज्य असून अवरोह संपूर्ण आहे.

o  या रागात दोन्ही नीषादचा प्रयोग केला जातो.

o  आरोहात शुद्ध तर अवरोहात कोमल नीषाद याप्रमाणे .

o  या रागाचा आरोह अवरोह :-

आरोह :-सा ग म प ध नी सां

अवरोह :-सां नी ध प म ग रे सा

राग :दुर्गा

थाट :-बिलावल,              वादी स्वर :-धैवत,            संवादी स्वर :-रिषभ

रागजाती:-ओडव ,           गानसमय:-रात्रीचा २ रा प्रहार

रागविशेष :-

या रागात गंधार आणि नीषाद हे स्वर वर्ज्य असून बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत.अवरोहात पंचम वक्र आहे. उदा.सां ध म प मरे

या रागाचा आरोह अवरोह :-

आरोह ;-     सा रे म प ध सां|

अवरोह ;-    सां ध प म रे सा 


राग : भिमपलास

थाट :-काफी ,                 वादी स्वर :-मध्यम ,         संवादी स्वर :-षड्ज

रागजाती :-ओडव –संपुर्ण ,            गानसमय:- दिवसाचा तिसरा प्रहार

रागविशेष :-

o   या रागात गंधार , नीषाद कोमल असून आरोहात रिषभ धैवत वर्ज्य आहे.

o   हा राग भक्तीरस प्रधान आहे.

o   या रागाचा आरोह अवरोह :-

आरोह :-नी सा ग म प नी सां

अवरोह :-सां नी ध प म ग रे सा 

 राग :बागेश्री

थाट :- काफी

वादी स्वर :-मध्यम ,  संवादी स्वर :-षड्ज

रागजाती :-ओडव –संपूर्ण   गानसमय :- रात्रीचा दुसरा प्रहार

रागविशेष :-

या रागात गंधार , नीषाद कोमल असून आरोहात रिषभ पंचम वर्ज्य आहे,अवरोह संपूर्ण आहे.हा राग श्रुंगाररस प्रधान आहे.या रागात अवरोहात पंचम स्वर वक्र आहे.सांनीधsम, पधमग ही स्वर संगती लागते.

या रागाचा आरोह अवरोह :-

आरोह :- नी सा म ध नी सां

अवरोह :- सां नी ध म , पधम, रेसा

राग:देस

थाट :-खमाज ,                वादी स्वर :-पंचम,                        संवादी स्वर :-रिषभ

रागजाती :-ओडव –संपूर्ण              गानसमय :-रात्रीचा २ रा प्रहार

रागविशेष :-

या रागाच्या आरोहात गंधार ,धैवत वर्ज्य असून अवरोह संपूर्ण आहे.दोन्ही नीषादाचा प्रयोग होतो.आरोहात शुद्ध तर अवरोहात कोमल नीषाद वापरतात.धमगरे गनीसा हि स्वरसंगती लागते.या रागाचा आरोह अवरोह :-

आरोह :-           सा रे म प नी सां

अवरोह :-          सां नी ध प ,धमगरे ,गनीसा
 


राग तिलक कामोद
 या रागामध्ये वादी स्वर षड्ज आहे तर संवादी स्वर पंचम आहे आरोहामध्ये गंधार व धैवत हे दोन स्वर वर्ज्य आहेत. हा खमाज थाटातून निर्माण होतो. राग जाती ओडव–संपूर्ण आहे. यामध्ये गंधार व निषाद या स्वरावर न्यास केला जातो. याचा गायन वेळ रात्रीचा दुसरा प्रहर आहे या रागांमध्ये दोन निषाद लागतात.
राग विशेष –
या रागात गंधार आणि मंद्र सप्तकातील निषाद यावर न्यास केल्याने तसेच तार सप्तकातील षड्ज कडून पंचमकडे किंवा पंचमाकडून तार षड्ज कडे मिंड मुळे हा राग स्पष्ट होतो.
आरोहात मपनीनीसां याप्रकारे शुद्ध निषादाचा प्रयोग केला जातो. या रागात सारेप मग याप्रकारे "रे–प" स्वर–संगतीचा प्रयोग केला जातो. याचा निकटवर्ती राग देस आहे. हा वक्र चलनाचा राग आहे. काही पंडित याला वक्र रूप मध्ये संपूर्ण राग म्हणतात. आरोहात सारेमप हे चार स्वर असून सुद्धा रागजाती ओडव–संपूर्ण आहे.

आरोह –
१) सा, रे, म, प, सां ।
२) सा, रे, म, प, धमप, सां ।
३) सा रे म प ध म प नी सां ।
अवरोह – सां s प , नी धमग, सारेग सानी, पनीसारेग सारे गs सा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you very much for your valuable feedback. Visit again