गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

तबला / पखवाज अभ्यासक्रम प्रवेशिका प्रथम



अ. भा. गां. म. मं. मिरज अभ्यासक्रम 

गुरुदेव  संगीत  विद्यालय , औरंगाबाद
E- mail dbstabla@gmail.com
Ph - 07588168939
प्रवेशिका प्रथम 







*प्रवेशिका प्रथम (तबला) परिभाषा*

*संगीत :-* गायन, वादन, नृत्य या तीन कलांना मिळून संगीत असे म्हणतात.
 *ध्वनी :-* ध्वनी म्हणजच आवाज होय. आघाताने किंवा घर्षणाने निर्माण होणाऱ्या आवाजास ध्वनी असे म्हणतात. “संगीत कलेसाठी हा सर्वात महत्वाचा घटक आहे.”
*नाद :-* संगीत उपयोगी ध्वनी म्हणजे नाद होय.

*श्रुती :-* कानांना स्पष्टपणे ऐकू येणाऱ्या नादांना श्रुती असे म्हणतात. श्रुती २२ आहेत.

*स्वर :-* बावीस श्रुतींच्या ७ भागांना प्रत्येकी स्वर असे म्हणतात. कर्णमधुर स्थिर नादास स्वर असे म्हणतात. स्वर सात (७ ) आहेत. सा- षड्ज , रे- रिषभ, ग- गंधार, म- मध्यम, प- पंचम, ध- धैवत, नि- निषाद.
*लय :-* लय म्हणजे गती, वेग. संगीतात वापरणाऱ्या गतीला लय असे म्हणतात. लयचे तीन प्रकार तीन आहेत.
*विलंबित लय –* संथगतीने, सावकाश चालणारी गती.
*मध्य लय –* संथ लयीपेक्षा दुप्पट वेगाने चालणारी गती.
*द्रुत लय –* अतिशय वेगाने चालणारी गती.
*बोल :-* तबल्यावर वाजणाऱ्या अक्षरांना बोल किंवा वर्ण असे म्हणतात.

*ठेका :-* तालाच्या मूळ बोलांना ठेका असे म्हणतात.
*आवर्तन :-* तालाच्या पहिल्या मात्रेपासून पहिल्या मात्रेपर्यंतच्या एका फेरीस आवर्तन असे म्हणतात.
 *किस्म / प्रकार :-* किस्म म्हणजे प्रकार. तालाच्या मूळ बोलांमध्ये बदल करून वाजवणे म्हणजे किस्म /प्रकार होय.
 *कायदा :-* तालाचे स्वरूप म्हणजेच मात्रा, सम, टाळी, काल, खंड, आवर्तन यामध्ये बदल न होऊ देता केलेली बोलांची अशी नियमबद्ध रचना कि जिचा विस्तार होतो अशा रचनेस कायदा असे म्हणतात.

*पल्टे / पल्टा :-* कायद्यातील मूळ बोलांमध्ये बदल करून वाजविणे म्हणजे पल्टा.

 *मुखडा :-* मुख म्हणजे “तोंड / चेहरा”. समेपुर्वी वाजविण्यात येणाऱ्या आकर्षक बोलसमुहास “मुखडा” असे म्हणतात.

 *तिहाई :-* “धा” या अक्षराने शेवट होणारा बोलांचा असा समूह कि जो जसाच्या तसा तीन वेळा वाजविला असता शेवटचा “धा” समेवर येऊन मिळतो त्यास तिहाई असे म्हणतात.

 *तिगुन / तिप्पट :-* एका मात्रेच्या वेळी तीन मात्रा म्हणणे, लिहिणे अथवा वाजविणे म्हणजे “तिगुन / तिप्पट” असे म्हणतात.

 *चौपट / चौगुन :-* एका मात्रेच्या वेळी चार मात्रा म्हणणे, लिहिणे अथवा वाजविणे म्हणजे “चौपट / चौगुन” असे म्हणतात.

 *तुकडा :-* तालामध्ये वाजविण्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या आकर्षक बोलरचनेस “तुकडा” असे म्हणतात.


 💫💫💫📖💫💫💫 गुरुदेव संगीत विद्यालय, औ.बाद http://digambarshinde.blogspot.com

२ टिप्पण्या:

Thank you very much for your valuable feedback. Visit again