गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

बासरी

बासरीवादन
चर्मवाद्ये, सुषिरवाद्ये, तंतुवाद्ये हे वाद्यांचे प्रकार आहेत. बासरी हे एक सुषिर वाद्य आहे. जुन्या ग्रंथांमध्ये वेणू, वंशी, पावरी, मुरली किंवा फिल्लगोरी या नावांनी बासरीचा उल्लेख झाल्याचे आढळते. पोकळ बांबूचा तुकडा तसेच लाकडी किंवा धातुची नळी यापासून हे वाद्य बनवितात. बांबूची बासरी सर्वात उत्तम मानली जाते. तसेच काही ठिकाणी पितळेची बासरी देखील वाजवितात. बांबूच्या बासरीतून जास्त मधूर स्वर निघतो, तसा धातुच्या बासरीतून निघू शकत नाही. बांबूची बासरी विशिष्ट सुराची मिळणे कठीण असते, आणि उष्ण हवामानात ती तडकून बेसूर होते. त्यामुळे पितळेची व लाकडी बासरी अधिक वापरात आहे.
आडवी धरून वाजवायची व सरळ धरून वाजवायची - असे बासरीचे दोन प्रकार आहेत. जी बासरी आडवी धरून वाजवितात तिला मुरली म्हणतात. ती वाजवायला जरा कठीण असते. सरळ धरून वाजवताना, बासरीचा वरचा भाग डाव्या हाताने व खालचा भाग उजव्या हाताने धरण्याची प्रथा आहे. मुरली वाजवताना हीच पध्दत सोयीची असते.
आपल्या भारत देशामधे, श्री.पन्नालाल घोष हे एक महान बासरीवादक होऊन गेले. आजच्या बासरी-वादकांमध्ये अग्रणी नाव म्हणजे, पंडित हरिप्रसाद चौरसिया हे होय.