गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०१७

“सत्र परीक्षा नवं / डिसें 2017”

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ , मिरज 

“सत्र परीक्षा नवं / डिसें 2017”

तर्फे घेण्यात येणाऱ्या गायन, वादन, नृत्य या विषयांची लिखित परीक्षा दि. १२ - नोव्हेंबर -२०१७ रोजी संपन्न होणार आहेत.

त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे :-



सकाळी ०९:०० ते ११:०० प्रवेशिका पुर्ण 
सकाळी ०९:०० ते १२:०० मध्यमा  प्रथम ते अलंकार पुर्ण 
तबला परीक्षा वेळ 
दुपारी ०२:०० ते ०४:०० प्रवेशिका पुर्ण
दुपारी ०२:०० ते ०५:०० मध्यमा प्रथम ते अलंकार पुर्ण 
( विशारद प्रथम ते अलंकार पुर्ण या वर्गांचे २ लिखित पेपर असल्यामुळे दोन्ही सत्रात परीक्षा असते.)

परीक्षा हि नियोजित वेळेत होत असते. 
आपल्या आई वडिलांचा आणि गुरुजींचा आशीर्वाद घेऊनच परीक्षेला जावे.
शिक्षक किंवा केंद्र व्यवस्थापकाशी संपर्क करून परीक्षेबाबत विचारणा करावी-
जसे ---परीक्षा केंद्र कोणते आहे?
आगोदर किती वेळ हजर राहावे? वगैरे . . . . .

परीक्षेला जाताना घ्यावयाची काळजी -

  • आगोदर किमान ३० ते १५ मिनिट हजर राहावे. 
  • सर्वात महत्वाचे हॉल तिकीट घेतले का?
  • पेन, पेन्सील, खोडरबर, पट्टी घेतला का?
  • उत्तरपत्रिकेसाठी रायटिंग बोर्ड घेतला का?? 
  • या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे तपासून पहा 


आपणास परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

रविवार, २३ जुलै, २०१७

दैनिक सकाळ मध्ये आलेली बातमी

दैनिक सकाळ मध्ये आलेली बातमी


गुरुदेव संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश 
औरंगाबाद / प्रतिनिधी
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय तर्फे घेण्यात येणार्‍या शास्त्रीय गायन, हार्मोनियम, तबला वादन परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला आहे.  या परिक्षेत गुरूदेव संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. 
विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असुन विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये तर काही विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणी घेऊन पास झाले आहेत. यात हार्मोनियम परीक्षेत प्रथम क्षेणीत सुमा अडाव, नारायण सोनवणे,सुनिता कोरडे  तर  प्रवेशिका प्रथम परीक्षेत देविदास बनकर , श्रद्धा चाटे, रागिणी पुराणिक, तन्मयी शिन्गेवार  यांनी प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले आहे. तबला परीक्षेत सुमेध वानखेडे, हर्षवर्धन ढवळे, प्रतीक्षा कुंभार हे विद्यार्थी प्रथम श्रेणी, तर कृष्णा दराडे, संचित धाडगे, वेदांत राठोड,  श्रेयस गाडेकर, पृथ्वीराज आंधळे, पार्थ काकडे हे विद्यार्थी प्रवेशिका प्रथम श्रेणीत उत्‍तीर्ण झाले आहे.  रुद्राक्ष मरकड प्रथम तर आदित्य रहाटवाड हे विशेष योग्यता आणि पार्थ मानुरकर,रितेश तांबोळी हे मध्यमा प्रथम श्रेणी उत्‍तीर्ण झाले. श्रीनिवास खतगावकर तृतीय श्रेणीत उत्‍तीर्ण झाला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे गुरुदेव संगीत विद्यालयाचे संचालक दिगंबर शिंदे आणि चैताली शिंदे तसेच पालक यांनी अभिनंदन केले आहे. 
तसेच श्री. प्रवीण कुलकर्णी साहेबांचे मनापासून आभार, आपण ही बातमी बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये दिली आहे.

सोमवार, २९ मे, २०१७

चि. गौरव भानुदास काकडे (एकल तबलावादन)

चि. गौरव भानुदास काकडे याने
अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे, येथे सादर केलेले तबलावादन वादन


बुधवार, २६ एप्रिल, २०१७

स्वरांगी शिंदे हिचे आकाशवाणीवर तबला वादन कार्यक्रम

*औरंगाबाद आकाशवाणी 101.7*

रविवारी दि. २३ एप्रिल २०१७ रोजी *औरंगाबाद आकाशवाणी 101.7* आमची मुलगी
          *कु. स्वरांगी दिगंबर शिंदे*
हिचे तबलावादन व *सौ.कानडे मॅडम* यांनी तिच्यासोबत मारलेल्या गप्पा आपण एकदा नक्की ऐका *बलासभा* या रेडिओवरील कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग आपणास पाठवत आहे.

ऑडिओ डाउनलोड करून ऐकायला विसरू नका, ही विनंती
🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
               आपले 
   *सौ.चैताली व श्री. दिगंबर शिंदे*
    🙏🙏🙏🙏🙏🙏


♭♮♯



गाणं डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा  स्वरांगी शिंदे हिचे तबला वादन DOWNLOAD करा

रविवार, ९ एप्रिल, २०१७

चि. गणेश मठपती

आपल्या क्लासमधील विद्यार्थी
*चि. गणेश मठपती याने विद्यालयासाठी स्वतः रेखाटलेले चित्र* सप्रेम भेट दिले आहे. त्याचे मनापासून अभिनंदन. तसेच त्याने काढलेले चित्र अप्रतिम आहे. मला खूप आवडले.


सोमवार, २३ जानेवारी, २०१७

Digambar Shinde स्वागतगीत, swagatgeet, welcome song, sva welcome song,

मित्रांनो नमस्कार,
स्वागतगीत बसविण्याचा प्रयत्न केला आहे. आपण एकदा पहावं आणि आपल्या प्रतिक्रिया दिलखुलास कळवाव्यात, हि एक ईच्छा. सदरील स्वागतगीत पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता आणि सभासद बनण्यासाठी लाल रंगातील अक्षरखाली subscribe या बटणवर क्लिक करा.