गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नमस्कार 
गुरुदेव संगीत विद्यालय तर्फे
आपणा  नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 
येणारे नवीन वर्ष  सुख, शांती,  समाधान, गरजवंतांची  सेवा,व देशसेवेसाठी कारणी पडो . 

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मी एक स्वागत गीत आपणास सप्रेम भेट देऊ इच्छितो. आपण त्याचा स्वीकार करावा हि सदिछा. 
प्रत्येक शाळेत, मंगलप्रसंगी, तसेच मंदिरात, धार्मिक ठिकाणी या गीताचा उपयोग होईल अशी खात्री आहे. 

या गीताविषयी थोडेसे…। 

१) हे स्वागत गीताचे शब्द व संगीत माझे परम मित्र श्री. उमाप सर यांनी केले आहे. त्यांचे मनापासून आभार.

२) माझे कार्यक्षेत्र असलेले ''स्वामी विवेकानंद अक्याडमि " प्रशाळा औरंगाबाद. या शाळेच्या वार्षिक स्नेहसम्मेलनात सादर केले. 

       हे गीत आपण माझ्या dropbox हुन download करू शकता.
त्यासाठी लिंक देत आहे,   … …. येथे क्लिक करा 

बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

पाहता दिवस उडुन जातील
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा!
एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हाद कारी सकाळ घेऊन येईल…
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची …
ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत….!
नविन वर्ष तुम्हाला सुख समुर्द्धि आणि भरभराटिचे जावो हिच श्रीच्या चरणी प्रार्थना…!!
सदगुरुक्रुपे आज समजते क्षण क्षण आहेत मोलाचे…
सर्वच दिवस सुखाचे सुखाचे येवोत स्वागत करु नव वर्षाचे …!
गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.
येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी प्रार्थना.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जावो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.

सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

🌹सा रे ग म प ध नी सां 🌹
🌺सा 🌺
सावधान असावे भजनी |
🌺 रे  🌺
रेशमा सारखी मृदु असावी वाणी |
🌺 ग 🌺
गर्व नसावा मानसी,परोपकारी असावी वृत्ती |
🌺 म 🌺
मधुर सुरेल संगीताने वाढवावी भजनाची गोडी |
🌺 प 🌺
परावृत्त करावे सकलांसी गैरमार्गा पासुनी |
🌺 ध 🌺
धरूनी ईश्वर नामाची कास प्रबोधन करावे भजनी |
🌺 नी 🌺
नीत्य गावी हरीकथा (सकल संत गाथा )तेणे मोद होईल भगवंता |
🌺 सां 🌺
साधकही उध्दरतील भजन श्रवण करीता |
🌷 ऐसा हा 'सा रे ग म प ध नी सां' स्वरांचा महिमा जाणावा सकलानी (भजनी बुवानी) आणि आचरण शुध्द ठेऊनी रंगावे भजनी ||






बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५

रागाचे गुण विशेष

रागाचे गुण विशेष :
१ राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा
२ राग यमन – कार्य शक्री वाढवणारा
३ राग देसकर – उत्थान व संतुलन साधणारा
४ राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा
५ राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग
६ राग शाम कल्याण – मूलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा
७ राग हमिर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि उर्जा निर्माण करणारा
८ राग केदार – स्वतःच्या कर्तत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारून भरपूर उर्जा निर्माण करणारा तसेच     मुलाधार उत्तेजित करणारा
९ राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधुन अहंकार संतुलनात आणनारा
१० राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व अध्यात्मीक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा
११ राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा भावनाप्रधान राग सर्व सदिच्छा पूर्णकरून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग
१२ राग मालकंस – अतिशय शांत - मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा
१३ राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा अध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जाग्रत करणारा असा आहे
१४ रग जयजयवंती – सुख समृद्धि दणारा राग असून यश दायक आहे विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो
१५ राग भिम पलासी – संसार सुख व प्रेम देणारा
१५ राग सारंग – कल्पना शक्ती व कर्यकुशलता वढिस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो  आत्मविश्वास वाढिस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग
१६ राग गौरी – शुध्द इच्छा , मर्यादाशिलता , प्रेम , समाधान , उत्थान इत्यादी गुण वर्धक राग. डाव्या

मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

व्हिडिओ

दि. १३. ०९. २०१५ रोजी विद्यालयाचा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा झाला. 

त्यानिमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गायन वादनाचे उत्कृष सादरीकरण केले. त्यातील काही विडिओ

स्वरांगी शिंदे आणि हर्षवर्धन पवार याचा विडिओ ----





माझे परममित्र मा. श्री . उमाप सर 

यांनी माझ्यासाठी केलेली हि छानशी कविता  



अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे 

आयोजित स्पर्धेत विद्यालयाचा विजेता तबला सहवादानाचा 

जी. एस. व्हि. ताल ग्रुप 


आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ऑनलाईन व्हिडिओ ला भेट द्या . 
धन्यवाद  

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०१५

गायन, वादन, नृत्य या विषयांची लिखित परीक्षा

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ , मिरज 

तर्फे घेण्यात येणाऱ्या गायन, वादन, नृत्य या विषयांची लिखित परीक्षा दि. २४ -एप्रिल -२०१६ रोजी संपन्न होणार आहेत.

त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे :-
गायन परीक्षा वेळ 
सकाळी ०९:०० ते ११:०० प्रवेशिका पुर्ण 
सकाळी ०९:०० ते १२:०० मध्यमा  प्रथम ते अलंकार पुर्ण 
तबला परीक्षा वेळ 
दुपारी ०२:०० ते ०४:०० प्रवेशिका पुर्ण
दुपारी ०२:०० ते ०५:०० मध्यमा प्रथम ते अलंकार पुर्ण 
( विशारद प्रथम ते अलंकार पुर्ण या वर्गांचे २ लिखित पेपर असल्यामुळे दोन्ही सत्रात परीक्षा असते.)

परीक्षा हि नियोजित वेळेत होत असते. 
आपल्या आई वडिलांचा आणि गुरुजींचा आशीर्वाद घेऊनच परीक्षेला जावे.
शिक्षक किंवा केंद्र व्यवस्थापकाशी संपर्क करून परीक्षेबाबत विचारणा करावी-
जसे ---परीक्षा केंद्र कोणते आहे?
आगोदर किती वेळ हजर राहावे? वगैरे . . . . .

परीक्षेला जाताना घ्यावयाची काळजी -

  • आगोदर किमान ३० ते १५ मिनिट हजर राहावे. 
  • सर्वात महत्वाचे हॉल तिकीट घेतले का?
  • पेन, पेन्सील, खोडरबर, पट्टी घेतला का?
  • उत्तरपत्रिकेसाठी रायटिंग बोर्ड घेतला का?? 
  • या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे तपासून पहा 


आपणास परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा