गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

रविवार, २३ जुलै, २०१७

दैनिक सकाळ मध्ये आलेली बातमी

दैनिक सकाळ मध्ये आलेली बातमी


गुरुदेव संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश 
औरंगाबाद / प्रतिनिधी
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय तर्फे घेण्यात येणार्‍या शास्त्रीय गायन, हार्मोनियम, तबला वादन परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला आहे.  या परिक्षेत गुरूदेव संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. 
विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असुन विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये तर काही विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणी घेऊन पास झाले आहेत. यात हार्मोनियम परीक्षेत प्रथम क्षेणीत सुमा अडाव, नारायण सोनवणे,सुनिता कोरडे  तर  प्रवेशिका प्रथम परीक्षेत देविदास बनकर , श्रद्धा चाटे, रागिणी पुराणिक, तन्मयी शिन्गेवार  यांनी प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले आहे. तबला परीक्षेत सुमेध वानखेडे, हर्षवर्धन ढवळे, प्रतीक्षा कुंभार हे विद्यार्थी प्रथम श्रेणी, तर कृष्णा दराडे, संचित धाडगे, वेदांत राठोड,  श्रेयस गाडेकर, पृथ्वीराज आंधळे, पार्थ काकडे हे विद्यार्थी प्रवेशिका प्रथम श्रेणीत उत्‍तीर्ण झाले आहे.  रुद्राक्ष मरकड प्रथम तर आदित्य रहाटवाड हे विशेष योग्यता आणि पार्थ मानुरकर,रितेश तांबोळी हे मध्यमा प्रथम श्रेणी उत्‍तीर्ण झाले. श्रीनिवास खतगावकर तृतीय श्रेणीत उत्‍तीर्ण झाला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे गुरुदेव संगीत विद्यालयाचे संचालक दिगंबर शिंदे आणि चैताली शिंदे तसेच पालक यांनी अभिनंदन केले आहे. 
तसेच श्री. प्रवीण कुलकर्णी साहेबांचे मनापासून आभार, आपण ही बातमी बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये दिली आहे.